नवी दिल्ली : बॉलिवुडचा लोकप्रिय दबंग अभिनेता सलमान खानच्या सुलतानने ३०० कोटीच्या पुढे कमाई केली आहे.
सलमानने पुन्हा अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यावर आपलं विशेष स्थान कायम असल्याचे सिद्ध केलं आहे.
सुलतान पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल गर्दी केल्याने कमाईही चांगलीच झाली. बॉक्स ऑफिसवर त्याचा प्रभाव दिसत आहे.
अली अब्बास जाफरने दिग्दर्शित केलेल्या सुलतानला चाहत्यांची दाद मिळत असल्याने सुलतान नवे विक्रम रचत आहे.