सलमान खानच्या बहिणीच्या लग्नाची तारीख निश्चित

बॉलिवूडमधील दबंग सलमान खान याची बहिण अर्पिता हिच्या लग्नाची तारीख नक्की झाली आहे. १६ नोव्हेंबरला अर्पिताचा विवाह होणार आहे.

Updated: Oct 7, 2014, 08:38 AM IST
सलमान खानच्या बहिणीच्या लग्नाची तारीख निश्चित title=

 मुंबई : बॉलिवूडमधील दबंग सलमान खान याची बहिण अर्पिता हिच्या लग्नाची तारीख नक्की झाली आहे. १६ नोव्हेंबरला अर्पिताचा विवाह होणार आहे.

सल्लूची बहिण अर्पिता काही दिवसांपासून उद्योगपती आयुष शर्मा याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहत होती. याबाबत दोन्ही कुटुंबीयांना माहिती होती. या दोघांचे लग्न हैदराबादमधील पांच सितारा हॉटेलमध्ये होणार आहे.

अर्पिताच्या लग्नाचे गॉसिप्स मीडियात चर्चेचा विषय झाला आहे. सल्लूची लाडकी बहिण असल्याने ती कोणता ड्रेस परिधान करेल, कोण कोण येणार, सल्लू तिला काय भेट देणार, याची चर्चा आहे.

या वर्षातील हे शानदार लग्न असेल, अशीही चर्चा आहे. या लग्नाला शाहरुख खानला आमंत्रित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. तर अर्पिता तीन भाऊ यांच्यापेक्षा सल्लूची अधिक जवळची आहे. सलमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रण देण्याची शक्यता आहे. मात्र, मोदी येतील की नाही, याबाबत चर्चा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.