Pic leaked: ‘पीके’ मध्ये अनुष्का शर्माचा जर्नलिस्ट लूक!

आमिर खानचा चित्रपट पीके आपल्या पोस्टर लॉन्चनं चर्चेत आहे. चित्रपटात संजय दत्त, अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंह राजपूत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटातील आमिर आणि संजय दत्तचा लूक तर आपण पाहिला... पण आता पहिल्यांदाच अनुष्काचा लूक लॉन्च झालाय.

Updated: Oct 7, 2014, 10:02 AM IST
Pic leaked: ‘पीके’ मध्ये अनुष्का शर्माचा जर्नलिस्ट लूक! title=

मुंबई: आमिर खानचा चित्रपट पीके आपल्या पोस्टर लॉन्चनं चर्चेत आहे. चित्रपटात संजय दत्त, अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंह राजपूत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटातील आमिर आणि संजय दत्तचा लूक तर आपण पाहिला... पण आता पहिल्यांदाच अनुष्काचा लूक लॉन्च झालाय.

चित्रपटातील लीड फिमेल अनुष्का शर्मा बॉब हेअरस्टाइलसह लूकमध्ये आपल्याला दिसेल. एंटरटेनमेंट साइट koimoiमध्ये अनुष्काच्या लूकचा फोटो प्रसिद्ध झालाय. 

पीकेमध्ये अनुष्का जर्नलिस्टच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात अनुष्का एका जर्नलिझमच्या विद्यार्थिनीच्या रुपात आहे. जिचं आपल्या बॉयफ्रेंडसोबत चांगलं नातं आहे. अनुष्काच्या बॉयफ्रेंडची भूमिका सुशांत सिंह राजपूतनं केलीय. 

चित्रपटाचं दिग्दर्शन राज कुमार हिरानी यांनी केलंय. १९ डिसेंबरला पीके रिलीज होणार आहे.  
 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.