मुंबई : सलमान खान पुन्हा एकदा मामा झालाय. सलमानची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांना ३० मार्च रोजी एक गोंडस मुलगा झाला. जीजाजी अतुल अग्निहोत्री यांनी मंगळवारी इन्स्टाग्रामवर एका फोटोच्या माध्यमातून या बाळाच्या जन्माची घोषणा केली.
आज मात्र त्याने या बाळाचा एक गोंडस फोटो अपलोड केलाय. अहिल असं या बाळाचं नामकरण करण्यात आलंय. अर्पिताच्या मुलाचा म्हणजेच सलमानच्या भाच्याच्या या फोटोची सध्या सलमानच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
Blessed moment pic.twitter.com/phO5WPncrF
— Atul Agnihotri (@atulreellife) March 30, 2016