सोलापूरची कन्या बॉलीवूडमध्ये झळकली

सोलापूरच्या दीप्ती धोत्रे ही तरूणी बॉलीवूडमध्ये झळकलीय. दीप्तीला आधीपासून अभिनयाचं वेड होतं. दीप्तीचा नुकताच 'धारा ३०२' हा चित्रपट प्रसिद्ध झाला आहे.  

Updated: Mar 30, 2016, 12:47 PM IST
सोलापूरची कन्या बॉलीवूडमध्ये झळकली title=

सोलापूर : सोलापूरच्या दीप्ती धोत्रे ही तरूणी बॉलीवूडमध्ये झळकलीय. दीप्तीला आधीपासून अभिनयाचं वेड होतं. दीप्तीचा नुकताच 'धारा ३०२' हा चित्रपट प्रसिद्ध झाला आहे.  

बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाल्याचा मला मनापासून आनंद झाला आहे, माझे आणखी २ मराठी चित्रपट लवकर येणार असल्याचं दीप्तीने म्हटलं आहे.

दीप्ती ही हिराचंद नेमचंद कॉलेजची विद्यार्थिनी आहे. दीप्तीने सलमान खानच्या 'बॉडीगार्ड' चित्रपटासाठी असिस्टंट एडिटर म्हणून तिने काम पाहिलं आहे. 

दीप्तीने मराठी रूपेरी पडद्यावर 'डोम' या चित्रपटातून प्रवेश केला होता. 'धारा ३०२'च्या माध्यमातून तिला मोठं यश मिळालं असल्याचं सांगण्यात येतंय.

'धारा ३०२' हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. राजस्थानातील कुख्यात गॅंगस्टर भानूप्रताप सिंह याचा जीवनपट यातून उलगडण्यात आला आहे.