'बजरंगी भाईजान'ची पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई

 बजरंगी भाईजानने पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी २८ कोटी रूपयांची कमाई केली आहे, सलमानचा यापूर्वीचा सिनेमा किकचा रेकॉर्ड बजरंगी भाईजानने तोडला आहे. 

Updated: Jul 18, 2015, 08:06 PM IST
'बजरंगी भाईजान'ची पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई title=

मुंबई :  बजरंगी भाईजानने पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी २८ कोटी रूपयांची कमाई केली आहे, सलमानचा यापूर्वीचा सिनेमा किकचा रेकॉर्ड बजरंगी भाईजानने तोडला आहे. 

बजरंगी भाईजानला संपूर्ण देशात ८० टक्के तर मुंबईत ९० टक्के ओपनिंग मिळाली आहे, सलमान खानच्या चित्रपटांना नेहमीच चांगली ओपनिंग मिळते.

सलमान खानच्या या चित्रपटाला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळतोय, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, जयपूर आणि इंदूरसारख्या शहरांमध्ये आजचे सर्व शो हाऊस फुल आहेत.

सलमान खानशिवाय चित्रपटात हर्षाली मल्होत्रा (मुन्नी, वाहिदा) आणि नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्या अभिनयाची वाहवा होतेय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.