'लव्ह इज बॅक'; सलमान-संगीता 'बाहुबली'च्या स्क्रिनिंगला

कधी काळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले सलमान खान आणि संगीता बिजलानी पुन्हा एकदा एकत्र दिसत आहेत. 'बाहुबली' या सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठीही सलमान - संगीता एकत्रच दिसले होते.

Updated: Jul 14, 2015, 03:11 PM IST
'लव्ह इज बॅक'; सलमान-संगीता 'बाहुबली'च्या स्क्रिनिंगला  title=

नवी दिल्ली : कधी काळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले सलमान खान आणि संगीता बिजलानी पुन्हा एकदा एकत्र दिसत आहेत. 'बाहुबली' या सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठीही सलमान - संगीता एकत्रच दिसले होते.

काही दिवसांपासून संगीताला सलमानसोबतच जास्त वेळा पाहिलं जातंय. बाहुबलीच्या वेळी पुन्हा हेच चित्र दिसलं. सलमानच्या गाडीत संगीताही होती. सलमान ड्रायव्हरच्या शेजारी पुढच्या सीटवर बसला होता तर संगीता कारच्या मागच्या सीटवर... 

एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर दोघंही सरळ सलमानच्या घरी पोहचले. 

यापूर्वी, हिट अॅन्ड रन प्रकरणात निकालाच्या वेळीही सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी संगीता उपस्थित होतीच. 

उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वी अरेंज मॅरेजाबद्दल काय विचार आहे? असा प्रश्न जेव्हा सलमानला विचारला गेला तेव्हा त्यानं 'मॅरेज कॅन्सल... लव्ह इज बॅक' असं म्हटलं होतं.

शिवाय, यंदाही बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत पोहचलेला सलमान अगोदरपासून उपस्थित असलेल्या संगीताच्या टेबलवर जाऊन बसलेला दिसला. 

संगीतानं सलमानशी ब्रेकअप झाल्यानंतर १९९६ मध्ये भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीनशी विवाह केला होता. पण, २०१० मध्ये या दोघांनी घटस्फोट घेऊन एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.