मुंबई: मी तुला तुझ्या वयाच्या 16 व्या वर्षांपासून ओळखतो, तुझ्याएवढी सामर्थ्यशाली व्यक्ती मी बघितली नाही, या शब्दांमध्ये सलमान खाननं कतरिना कैफचं कौतुक केलं आहे. बिग बॉस सिझन 9 च्या फायनलमध्ये कतरिना आली होती. त्यावेळी सलमाननं तिचं तोंडभरून कौतुक केलं.
16 व्या वर्षी तु बॉलीवूडमध्ये आलीस आणि फक्त मेहनतीमुळे इथपर्यंत पोहोचलीस असंही सलमान म्हणालाय. कतरिनाच्या सौंदर्यापासून ते तिच्या डान्सपर्यंत सलमान भलताच फिदा झाला होता.
बिग बॉसच्या फायनलमधून कोण स्पर्धक बाहेर जाणार याची घोषणा करायला कतरिनाला सांगण्यात आलं. तेव्हा मी तुमच्या जागी असते तर मला रडू कोसळलं असतं असं कतरिना म्हणाली. तेव्हा खोटं बोलू नकोस, तु एक सामर्थ्यशाली महिला आहेस, तू 16 वर्षांची असल्यापासून मी तुला ओळखतो, असं सलमान म्हणाला.
सलमानचं कतरिनासोबत झालेलं ब्रेक अप, त्यानंतर रणबिर कपूर सोबतचं तिचं रिलेशनशीप मग ब्रेक अप आणि आता पुन्हा सलमाननं केलेलं कौतुक. यामुळे पुन्हा चर्चा सुरु झाल्या नाही तरच नवलं..