बिग बॉस 9 चा विनर प्रिन्सची नवी इनिंग

बिग बॉस सिजन 9 चा विनर प्रिन्स नरुला आता नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. बिग बॉस, एमटीव्ही रोडीज एक्स 2, एमटीव्ही रोडीज स्पिल्ट्सविला 8 यामध्ये काम प्रिन्सनं काम केलं आहे. आणि आता प्रिन्स अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहे. 

Updated: Jan 24, 2016, 08:20 PM IST
बिग बॉस 9 चा विनर प्रिन्सची नवी इनिंग title=

मुंबई: बिग बॉस सिजन 9 चा विनर प्रिन्स नरुला आता नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. बिग बॉस, एमटीव्ही रोडीज एक्स 2, एमटीव्ही रोडीज स्पिल्ट्सविला 8 यामध्ये काम प्रिन्सनं काम केलं आहे. आणि आता प्रिन्स अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहे. 
बिग बॉस 9 जिंकल्यानंतर आता मला चित्रपट आणि सिरियल्समध्ये काम करायंच आहे, अशी प्रतिक्रिया प्रिन्सनं दिली आहे. आधीपासूनच माझ्याकडे 2 शो होते. पण बिग बॉसच्या शूटिंगमुळे मला हे शो करता आले नाहीत, लवकरच याच्या कामाला मी सुरुवात करीन असं प्रिन्सनं सांगितलं आहे. 
चित्रपटात काम करायचं माझं स्वप्न आहे, सलमान खान, शाहरुख, अक्षय कुमार माझे आदर्श आहेत, असंही प्रिन्स म्हणाला आहे. 

प्रिन्स सलमानला करणार मदत

बिग बॉस 9 जिंकल्यानंतर प्रिन्सला 35 लाख रुपये मिळाले आहेत. यातले 5 लाख रुपये प्रिन्स सलमानची संस्था बिईंग ह्युमनला दान करणार आहे. तर उरलेले 30 लाख रुपये वडिलांना देणार असल्याचं प्रिन्सनं सांगितलं आहे.