खोट्या 6 पॅक अॅब्सवर पहा व्हिज्युअल इफेक्टची कमाल

 बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानच्या बॉडीचे जगभरात लाखो चाहते आहेत. पण ही बॉडी खरी नसून खोटी आहे. या गोष्टीवर आपला विश्वास बसणार नाही. पण एका व्हिज्युअल इफेक्ट कंपनी यू ट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये सलमान खानच्या खोट्या बॉडीची बनवाबनवी समोर आली आहे.

Updated: Sep 19, 2014, 09:43 PM IST
खोट्या 6 पॅक अॅब्सवर पहा व्हिज्युअल इफेक्टची कमाल title=

मुंबई : बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानच्या बॉडीचे जगभरात लाखो चाहते आहेत. पण ही बॉडी खरी नसून खोटी आहे. या गोष्टीवर आपला विश्वास बसणार नाही. पण एका व्हिज्युअल इफेक्ट कंपनी यू ट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये सलमान खानच्या खोट्या बॉडीची बनवाबनवी समोर आली आहे.

 

कंपनीने व्हिज्युअल इफेक्ट्स करणाऱ्या व्यक्तींसाठी हा मोन्टाज यूट्यूबवर अपलोड केला होता. कंपनीचा हा दाव नेमका उलटा पडला असून लोकांना सल्लूमियाँची खरी बॉडी असलेला व्हिडिओ मीडियाच्या हाती लागला. कंपनीने हा व्हिडिओ यूट्यूबवरून काढून टाकला आहे.  टाटाच्या डिजिटल प्रोडक्शन स्टूडिओ VCL Tata EIxsi माँटेज कंपनी चित्रपटांसाठी व्हिज्युअल इफेक्ट तयार करते.

 

मोन्टाज फक्त सलमान खानच्या बॉडीवर व्हिज्युअल इफेक्ट दाखविण्यासाठी काढण्यात आला होता. पण, बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अनिमेशन वर्क सुद्धा दाखविण्यात आले. व्हिडिओमध्ये जेव्हा सल्लूमियाँ शर्ट काढतो. तेव्हा सिक्स पॅकच्या जागी फॅटी बॉडी दिसून आली आहे. पण, व्हिज्युअल इफेक्ट दिल्यानंतर सलमानचे सिक्स पॅक दिसून आले आहे. पुढे आम्ही सलमान खानच्या बॉडीचे व्हिज्युअल इफेक्टसच्या फोटोच्या माध्यमातून सिक्स पॅक अॅब्स बॉडीमधील बदल दाखविले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.