हैदराबाद : बॉलीवूडचे सुपरस्टार सलमान खान किती मस्करी करतो हे तुम्हांला माहीत आहे. एखादा शो असो वा समारंभ तो आपल्या मस्करीच्या मूडमधून बाहेर येत नाही. एवढेच नाही तर सोशल मीडियावरही अशा प्रकारची मस्करी करत असतो. पण असे करताना आपल्या फॅन्सला दिलेले वचनही तो पूर्ण करतो.
सलमानने आपल्या फॅन्सला अर्पिताच्या लग्नाचे फोटो शेअर करण्याचे वचन दिले होते. ते वचन त्याने निभावले आहे. त्यामुळे त्याचे फॅन्स खूप खूश आहेत. पण सलमानने असे करताना त्याबरोबर असे काही लिहिले की जे वाचून तुम्ही गालातल्या गालात हसल्याशिवाय राहणार नाही. तसेच त्यांच्या मस्तीचा मूडही तुम्हांला लक्षात येईल.
सलमानच्या मस्करीशी तुम्ही परिचीत आहात. आता त्याचा खुलेपणाही कसा आहे, ते पाहा.... गुरूवारी रात्री सलमान खानने आपली बहिण अर्पिता आणि तिचा पती आयुषचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. आणि सोबत लिहिले की याचं आता लग्न झाले आहे.
हे तर ठीक आहे. हे सर्वांना माहीत आहे. पण त्यानंतर आणखी एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले. आता त्यांना जे काही करायचं ते करू शकतात...
तुम्हांला माहिती असेल की बिग बॉस 8 चे होस्टिंग सलमान करीत आहे. एपिसोड संपत असताना तो नेहमी म्हणतो ‘'do what ever you want to do Man...' तसचं काहीसं आपल्या बहिणीबद्दल बोलल्यामुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या आणि काहींनी ते सहजतेने घेतले.
वास्तविक असे म्हणण्याची काही गरज नव्हती. पण सलमान तर सलमान आहे. तो स्वतः म्हणतो ट्विटरवर तो कधीकधी टाइमपास करण्यासाठी आणि मस्करी करण्यासाठी पोस्ट करतो. त्यामुळे एकदा काही बोलले तर बोलले. त्याचं सलमानला काही वाटत नाही. आता याच मस्करीच्या मूडमध्ये आपल्या बहिणी आणि भावोजीबद्दल त्याने ट्विट केले आहे.
सलमानने कतरिना म्हटले कतरिना कपूर
१८ नोव्हेंबरला सलमानची लाडकी बहीण अर्पिताच्या लग्नाला कतरिना कैफही उपस्थित होती. यादरम्यान, तिनं खूप धमाल केली आणि नृत्यही केलं.
एका रिपोर्टनुसार अर्पिताच्या लग्नात डांस परफॉर्मन्स दरम्यान सलमान खाननं कतरिनाला ‘कतरिना कपूर’ हाक मारली. सलमानची जीभ जरी घसरली असेल तरी कतरिनाला हे आवडलं की नाही, हे सांगता येत नाही.
सलमान खान ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर डांस करण्यासाठी कतरिना कैफला आवाज देत होता. त्यानं दोन-तीन वेळा कतरिना कैफ आपल्यासमोर डांस करेल असं अनाऊंस केलं. पण ती आली नाही तेव्हा सलमाननं ‘कतरिना कपूर कॅन यू प्लीज कम ऑन स्टेज’ अशी हाक मारली. तेव्हा कतरिना थोडी दचकलीच पण नंतर तिनं आपल्या डांसनं सर्वांनाच खूश नाचवलं, असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय.
सलमाननं कतरिनाच्या लग्नाचं आमंत्रण कतरिना कैफला पण दिलं होतं. अर्पिताच्या लग्नात ती खूप खूश दिसत होती. रणबीर कपूरसोबत कतरिनाचं नातं आता सगळ्यांनाच माहितीय. पण आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या तोंडून सध्याच्या बॉयफ्रेंडचं नाव ऐकून कॅटला कसं वाटलं असेल, हे तिलाच माहित.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.