'मोहेंजोदारो'मधील पूजा हेगडेचा फर्स्ट लूक रिलीज

'मोहेंजोदारो' चित्रपटातील पूजा हेगडेचा पहिला लूक रिलीज झालाय. हा चित्रपट भारतातील प्रसिद्ध प्राचीन संस्कृती मोहंजोदारोवर आधारित आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित मोहेंजोदारो या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये हेच दाखविण्यात आले होते.

Updated: Jun 17, 2016, 02:12 PM IST
'मोहेंजोदारो'मधील पूजा हेगडेचा फर्स्ट लूक रिलीज title=

मुंबई : 'मोहेंजोदारो' चित्रपटातील पूजा हेगडेचा पहिला लूक रिलीज झालाय. हा चित्रपट भारतातील प्रसिद्ध प्राचीन संस्कृती मोहंजोदारोवर आधारित आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित मोहेंजोदारो या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये हेच दाखविण्यात आले होते.

कसा आहे पूजाचा फर्स्ट लूक 

‘मोहेंजोदारो’मधील पूजा हेगडेचा पहिला लूक तिने ट्विटरवर शेअर केला आहे. २५ वर्षीय पूजा मोहेंजोदारोमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटाच्या या पोस्टरमधून पूजा हेगडेच्या रोलची ओळख करून देण्यात आली आहे. भरजरी आकर्षक ड्रेस परिधान केलेली पूजा हेगडे या पोस्टरमध्ये लक्ष वेधून घेते.

चित्रपटात पुजाच्या भूमिकेचे नाव ‘चानी’ असे असणार आहे. पुजासोबत ऋतिक रोशन मुख्‍य भूमिकेत आहे. निळा, लाल आणि चंदेरी रंगाचा ड्रेस आणि डोक्यावर आभूषणे परिधान केलेला पूजा हेगडेचा हा लूक तिच्या भूमिकेबाबतची उत्सुकता वाढवणारा आहे. हा चित्रपट येत्या १२ ऑगस्टला रिलीज होणारे.