सलमाननं बॉडीगार्डच्या थोबाडात दिली ठेऊन

सलमान खान आणि वाद यांचं नातं काही तुटायचं नाव घेत नाहीय... आता, सलमान चर्चेत आहे तो त्याच्याच एका बॉडीगार्डच्या थोबाडीत लगावल्यानं... 

Updated: Feb 5, 2016, 05:35 PM IST
सलमाननं बॉडीगार्डच्या थोबाडात दिली ठेऊन title=

नवी दिल्ली : सलमान खान आणि वाद यांचं नातं काही तुटायचं नाव घेत नाहीय... आता, सलमान चर्चेत आहे तो त्याच्याच एका बॉडीगार्डच्या थोबाडीत लगावल्यानं... 

त्याचं झालं असं की, प्रीती झिंटा हिच्या वाढदिवशी डिनरनंतर सलमान खान प्रीती आणि सुझान खान यांना त्यांच्या गाड्यापर्यंत पोहचवायला बाहेर पडला. 

आणि झालं... एकच गोंधळ उडाला... मीडियानं त्यांना गराडा घातला... फोटो काढण्यासाठी कॅमेऱ्याचे फ्लॅश झापाझप उघडले... जोरजोरात प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. 

हे सगळं पाहून सलमानचे बॉडिगार्ड मीडियाच्या लोकांना थांबवण्यासाठी पुढे सरसावले. यातच सलमानच्या एका बॉडीगार्डनं एका प्रेसच्या व्यक्तीला धक्का दिला. 

पूर्वीचे अनुभव गाठिशी असलेल्या सलमाननं हे पाहताच बॉडिगार्डच्याच एक थोबाडात ठेऊन दिली... आणि मग त्यानं कॅमेरामॅनला पिच्छा न करण्याचं सांगत तो निघून गेला. 

याआधीही सलमानच्या बॉडिगार्डसनं मीडियाला धक्काबुक्की केली होती. तसंच एका चाहत्यालाही थोबाडात ठेऊन दिली होती. त्यावेळी, सलमान बराच अडचणीत आला होता.