सलमान खान अनुष्कावर फिदा

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानने 'सुल्तान'मधील त्याची सहकलाकार अनुष्का शर्माचं तोंडभरुन कौतुक केलंय. 

Updated: Mar 19, 2016, 06:02 PM IST
सलमान खान अनुष्कावर फिदा title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानने 'सुल्तान'मधील त्याची सहकलाकार अनुष्का शर्माचं तोंडभरुन कौतुक केलंय. तिच्यासारख्या 'प्रतिभावान' कलाकारासोबत काम करुन त्याला आनंद झाला असल्याचं त्याने म्हटलंय. गेल्यावर्षी जेव्हा चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा खरं तर अनेक अभिनेत्रींच्या नावाचा विचार केला गेला. परंतु, नंतर अनुष्काच्या नावावर शिक्कामोर्तब केलं गेलं. 

सलमानला नुकतंच एका ठिकाणी त्याच्या अनुष्कासोबत काम करण्याच्या पहिल्यावहिल्या अनुभवाविषयी विचारलं गेलं. तेव्हा तो म्हणाला की 'हा अनुभव मस्त होता. चांगल्या आणि प्रतिभावान कलाकारांसोबत काम करताना छान वाटलं.' 

या चित्रपटात सलमानने हरयाणा राज्यातील एका पेहलवानाची भूमिका केली आहे. हा चित्रपट त्याने केलेल्या चित्रपटांपैकी सर्वात कठीण चित्रपट असल्याचेही त्याने म्हटले होते. अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यंदाच्या वर्षी ईदच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होईल.