मुंबई: सलमान खान हिट एंड रन प्रकरणातल्या खटल्याचं कामकाज 25 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आलंय. कल्पेश वर्मा नावाच्या साक्षीदारानं पोलिसांना दिलेल्या जबाबाची प्रत गहाळ झाली आहे.
कल्पेश वर्मा हा जे. डब्लू. मेरीयट हॉटलच्या पार्किंग विभागात काम करतो. 22 सप्टेंबर 2002 रोजी कल्पेश वर्मा हा घटनास्थळी पोहचला होता. त्याने जखमींना इस्पितळात नेले होते. दुसरा साक्षीदार अमिन शेख हा घटनास्थळी उपस्थित होता. त्याने सलमान खान याला अपघाताच्या ठिकाणी पाहिले होते.
या साक्षीदारांची जबाबाची प्रतही गहाळ झालीये. या दोन्ही साक्षीदारांचे जबाब गहाळ झाल्यानं पुढील सुनावणी 25, 30 आणि 31 जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.