सुलतानच्या शूटिंगवेळी सलमान भडकला

सलमान खानचा आगामी चित्रपट सुलतानच्या सेटवरचा एक फोटो लिक झाला आहे.

Updated: Apr 4, 2016, 07:08 PM IST
सुलतानच्या शूटिंगवेळी सलमान भडकला title=

मुंबई: सलमान खानचा आगामी चित्रपट सुलतानच्या सेटवरचा एक फोटो लिक झाला आहे. या फोटोमध्ये सलमान लंगोटमध्ये दिसत आहे. पण हा फोटो लिक झाल्यामुळे सलमान खान चांगलाच भडकला आहे. 

सुलतानच्या सेटवरच्या सुरक्षेबाबत सलमाननं नाराजी व्यक्त केली आहे. तसंच आता चोख सुरक्षा ठेवा असंही सलमाननं सांगितलं आहे. 

यशराज फिल्मच्या या चित्रपटामध्ये सलमानबरोबर अनुष्का शर्मा असणार आहे. पहेलवान सुलतान अली खान यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. ईदला हा चित्रपट रिलीज होणार आहे.