सल्लू मामाचं आपल्या सुपरस्टार भाच्याला पहिलं वहिलं गिफ्ट!

सुपरस्टार सलमान खान याची बहिण अर्पिता खान शर्मा हिनं नुकतंच एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. आता, आपल्या लाडक्या नवजात भाच्याला सल्लू मामाकडून गिफ्ट मिळणार नाही, असं कसं होईल.

Updated: Apr 6, 2016, 10:18 PM IST
सल्लू मामाचं आपल्या सुपरस्टार भाच्याला पहिलं वहिलं गिफ्ट! title=

मुंबई : सुपरस्टार सलमान खान याची बहिण अर्पिता खान शर्मा हिनं नुकतंच एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. आता, आपल्या लाडक्या नवजात भाच्याला सल्लू मामाकडून गिफ्ट मिळणार नाही, असं कसं होईल.

आपल्या महागड्या गिफ्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिलदार सलमान खाननं चिमुकल्या अहिलला एक महागडी कार गिफ्ट दिल्याचं समजतंय. 

सलमाननं आपला भाचा अहिल याच्या जन्माच्या निमित्तानं एक बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केलीय. या गाडीची किंमत जवळपास १.०७ करोड रुपये असल्याचं सांगितलं जातंय.