सलमानच्या होम प्रोडक्शनच्या 'हिरो' सिनेमाला 30 मिनिटांची कात्री

सुपरस्टार समलान खान याच्या होम प्रोडक्शनचा सिनेमा 'हिरो' यातील 30 मिनिटांची दृश्य कापण्यात आली आहेत. निर्देशक निखिल आडवाणी यांनीच ही माहिती दिली.

Updated: Aug 25, 2015, 03:32 PM IST
सलमानच्या होम प्रोडक्शनच्या 'हिरो' सिनेमाला 30 मिनिटांची कात्री title=

मुंबई : सुपरस्टार सलमान खान याच्या होम प्रोडक्शनचा सिनेमा 'हिरो' यातील 30 मिनिटांची दृश्य कापण्यात आली आहेत. निर्देशक निखिल आडवाणी यांनीच ही माहिती दिली.

1983मध्ये आलेल्या 'हिरो' या सिनेमाचा हा रिमेक आहे. निखिलला एका मुलाखतीत विचारण्यात आले, या सिनेमात सलमानचा किती प्रभाव पडला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आधीच सलमानला विचारून सिनेमात काय पाहिजे ते विचारलेय.

निखिलने पुढे सांगितले की, मी सिनेमा एडिटींग करणार आहे. त्यावेळी तू उपस्थित राहा. नाहीतर हा सिनेमा पूर्ण होऊ शकणार नाही. तूच सांग सिनेमात काय चांगले आहे, काय नाही. त्यावेळी सलमानने हा सिनेमा एडिट करताना उपस्थित होता. सलमाननेच सिनेमातील 30 मिनिटांचा भाग कापून टाकला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.