दुबईला जाण्यासाठी सलमानची अगोदर न्यायालयात धाव

सलमान खानला 2002 हिट अॅन्ड रन प्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. आता सलमानने एका शोनिमित्त दुबईला जाण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

Updated: May 22, 2015, 04:23 PM IST
दुबईला जाण्यासाठी सलमानची अगोदर न्यायालयात धाव title=

मुंबई : अभिनेता सलमान खाननं दुबईला जाण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केलाय. 

सलमान खानला २००२ 'हिट अॅन्ड रन' प्रकरणी सत्र न्यायालयाने मनुष्य वधाच्या गुन्ह्यांअंतर्गत दोषी ठरवल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केलाय. मात्र, भारत सोडून जाण्यास सलमानला बंदी घालण्यात आलीय. सलमानला देश सोडून बाहेर जायचं असल्यास न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे. 

दरम्यान, २९ मे रोजी सलमानचा दुबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमासाठी आपल्याला दुबईला जाण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती सलमाननं न्यायालयाकडे केलीय.

सलमानच्या या याचिकेवर न्यायलय पुढील आठवड्यात निर्णय देण्याची शक्यता आहे.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.