सलमान आणि कतरिना पुन्हा एकत्र

अभिनेत्री कतरिना कैफने आजवर साकारलेल्या विविध भूमिका आणि चित्रपटांच्या मागे अभिनेता सलमान खानचे महत्त्वाचे योगदान असल्याचे म्हटले जातं.. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 5, 2017, 08:12 PM IST
सलमान आणि कतरिना पुन्हा एकत्र  title=

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफने आजवर साकारलेल्या विविध भूमिका आणि चित्रपटांच्या मागे अभिनेता सलमान खानचे महत्त्वाचे योगदान असल्याचे म्हटले जातं.. 

कतरिना आणि सलमान यांच्याविषयीच्या अनेक चर्चांना बी टाऊनमध्ये उधाण येत असते. त्यामुळे अनेकदा या दोन्ही कलाकारांच्या नात्याला रिलेशनशिपचेही नाव देण्यात आले. 

भाईजान सलमान आणि कॅट ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कतरिनाला तिच्या करिअरमध्ये चित्रपटांची निवड करण्यासाठी सलमान तिला मदत करतोय. 

सलमान कतरिनाला तिच्या चित्रपटांच्या निवडीसाठी मदत करण्यासोबतच कोणत्या प्रकारचे चित्रपट योग्य ठरतील याबाबतचा सल्लाही देत असल्याची चर्चा रंगतेयं..