'मेहबूब'नं ऐश्वर्या - सलमानला एकत्र आणलं?

'दुनिया बहोत छोटी है' असं म्हणतात... कदाचित असंच ऐश्वर्या आणि सलमानला वाटलं असेल... जेव्हा एकमेकांची तोंडं न पाहणारे हे एकेकाळचं 'लव्हबर्ड' एकाच ठिकाणी शूटींगसाठी दाखल झाले.

Updated: Jul 22, 2015, 01:15 PM IST
'मेहबूब'नं ऐश्वर्या - सलमानला एकत्र आणलं? title=

मुंबई : 'दुनिया बहोत छोटी है' असं म्हणतात... कदाचित असंच ऐश्वर्या आणि सलमानला वाटलं असेल... जेव्हा एकमेकांची तोंडं न पाहणारे हे एकेकाळचं 'लव्हबर्ड' एकाच ठिकाणी शूटींगसाठी दाखल झाले.

ऐश्वर्या आणि सलमान... स्क्रिनवर हे कपल जितकं सुंदर दिसत होतं त्याहून कित्येक पटीनं जास्त उत्सुकता त्यांच्या फॅन्समध्ये या जोडीच्या रिअल लाईफबद्दल होती. त्यामुळेच, आजही अभिषेकची पत्नी ऐश्वर्या आणि सलमान खान एकमेकांच्या आसपासही दिसले तरी सगळ्यांच्या नजरा आपसूकच त्यांच्याकडे वळतात. 

असाच एक क्षण मेहबूब स्टुडिओमध्ये पाहायला मिळाला. ऐश्वर्या राय-बच्चन आणि सलमान खान दोघंही एकाच वेळी मेहबूब स्टुडिओमध्ये शूट करत होते... पण वेगवेगळे... दोघांचे स्टुडिओही वेगळे होते.

सलमान  खान बिईंग ह्युमनच्या कॅम्पेनमध्ये व्यस्त होता तर ऐश्वर्या एक मॅगझिनच्या कव्हर पेजच्या फोटो शूटमध्ये व्यस्त होती.

सध्या, दीपिका - रणबीर असो किंवा करीना - शाहीद असो किंवा अमिताभ - रेखा... या जोड्या ब्रेकअपनंतरही स्क्रीन शेअर करण्यासाठी तयार झालेल्या दिसत आहेत... तशीच संधी ऐश्वर्या आणि सलमानच्या फॅन्सलाही मिळणार का? अशी चर्चा यामुळे सुरू झालीय. 
  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.