दबंग सलमान खानचा आज ५० वा वाढदिवस

दबंग खान सलमानच्या वाढदिवस म्हणजे त्याच्या फॅन्ससाठी जणू मोठा सणच. त्यामुळंच आपल्या लाडक्या भाईजानला भेटण्यासाठी, त्याची एक झलक पाहण्यासाठी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शेक़डो चाहते रात्रभर त्याच्या घराबाहेर जमले होते.. 

Updated: Dec 27, 2015, 08:29 AM IST
दबंग सलमान खानचा आज ५० वा वाढदिवस title=

मुंबई : दबंग खान सलमानच्या वाढदिवस म्हणजे त्याच्या फॅन्ससाठी जणू मोठा सणच. त्यामुळंच आपल्या लाडक्या भाईजानला भेटण्यासाठी, त्याची एक झलक पाहण्यासाठी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शेक़डो चाहते रात्रभर त्याच्या घराबाहेर जमले होते.. 

काहींनी तर रात्री केक कापत सलमानचा वाढदिवस साजरा केला. मुंबईतल्या विविध भागातूनच नाही तर देशाच्या कानाकोप-यातून हे फॅन्स इथं जमलेत. काहींनी तर पोस्टर्सच्या माध्यमातून लाड़क्या स्टारला शुभेच्छा दिल्यात.

सलमानता आज ५० वा वाढदिवस साजरा होतोय. १९८८ मध्ये सलमानने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर बॉलीवूडमध्ये वेगळी अशी छाप उमटवलीये. १९८९मध्ये आलेला मैने प्यार किया या सिनेमाने सलमानला ओळख मिळवून दिली. तेव्हापासून आजतायगत तो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनून आहे. या सिनेमानंतर सलमानने मागे वळून पाहिलेच नाही. एकसो एक गाजलेले हिंदी चित्रपट त्याच्या नावावर आहेत.