मुंबई : लग्न झाल्यावर लोक बदलतात असं म्हटलं जातं. अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूरच्या बाबतीतही असंच काहीतरी आहे असं म्हणायला हवं. लग्न झाल्यानंतर ऑन स्क्रीन कोणालाही किस न करण्याचं धोरण त्यांनी अवलंबलं होतं. पण, आता मात्र त्यात बदल झालेला दिसतोय.
'डीएनए' वृत्तपत्रातील एका बातमीनुसार सैफ आणि करीनाने आपण चांगले आणि समजूतदार कलाकार असल्याने आता ऑन स्क्रीन किस करण्यास कोणतीही अडचण नसावी असा निर्णय घेतल्याचं समजतंय. करीना कपूर आणि अर्जुन कपूरचा आगामी चित्रपट 'की अॅण्ड का' मध्ये जर स्क्रीप्टची गरज असेल तर करीनाने अर्जुनला ऑन स्क्रीन किस करण्यास काहीच हरकत नसल्याचं सैफने म्हटलं आहे.
आता आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी नियम शिथील केले म्हटल्यावर करीना तरी कशी मागे राहील? सैफ करत असलेल्या कोणत्याही चित्रपटात जर स्क्रीप्टची गरज असेल तर त्याने त्या अभिनेत्रीला किस करावं असं तिने मान्य केलं आहे. काळानुसार माणसंही बदलतात असं म्हणायला हवं.