ही सैफची मुलगी आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही!

गेल्या अनेक दिवसांपासून अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा खान हिच्या बॉलिवूड एन्ट्रीची चर्चा होत होती... पण, आता मात्र साराला पाहून तिच्या केवळ लूकचीच चर्चा सुरू आहे.

Updated: Apr 5, 2016, 03:19 PM IST
ही सैफची मुलगी आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही! title=

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा खान हिच्या बॉलिवूड एन्ट्रीची चर्चा होत होती... पण, आता मात्र साराला पाहून तिच्या केवळ लूकचीच चर्चा सुरू आहे.

शाहिद कपूरचा छोटा भाऊ इशान खट्टर याच्यासोबत करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इअर २' या सिनेमात सारा दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

परंतु, साराची किंवा तिच्या कुटुंबीयांची मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. सारानं कधी सोशल मीडियावर आपले फोटोही शेअर केलेले नाहीत. यापूर्वी ती मीडियासमोर दिसली होती ती तिच्या वडिलांच्या म्हणजेच सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्या लग्नात... 

Sara Khan
सारा खान (सौ. पिंकविला)

आता मात्र, 'पिंकविला' या वेबसाईटनं साराचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. यात साराचा आत्ताचा लूक सगळ्यांचच लक्ष वेधून घेतोय. प्रेक्षकांनाही आता साराच्या बॉलिवूड एन्ट्रीची उत्सुकता लागून राहिलीय.