मुंबई : लोकप्रिय रिअॅलिटी कार्यक्रम 'बिग बॉस'च्या यंदाच्या म्हणजेच दहाव्या सीझनमध्ये तुम्हीही सहभागी होऊ शकता. कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी यासाठी लोकांची ऑडिशनही सुरू केलंय.
तुम्हालाही या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही ऑडिशन देऊ शकता. गेल्या काही वर्षांप्रमाणेच यंदाही अभिनेता सलमान खान हाच या कार्यक्रमाचा होस्ट असेल किंवा नाही, याबाबतीत अद्याप खुलासा झालेला नाही.
परंतु, या कार्यक्रमाचा पहिला वहिला प्रोमो मात्र जाहीर करण्यात आलाय. यानुसार, सेलिब्रिटिंसोबत आता सामान्यांनाही बिग बॉसच्या घरात राहण्याची संधी मिळू शकते.