मुंबई : विशाल भारद्वाजच्या आगामी सिनेमा 'रंगून' यामध्ये शाहिद कपूर आणि सैफ अली खान एकत्र पाहायला मिळाल्याचे सर्वांना माहित आहे. आता शाहिदचा भाऊ ईशान आणि सैफची मुलगी सारा एकत्र सिमेनात एंट्री करणार आहेत.
एका वेबसाईटने याबाबत वृत्त दिलेय. शाहिदचा भाऊ ईशान आणि सैफची मुलगी सारा करन जौहरच्या सिनेमात एकत्र दिसण्याची शक्यता आहे. याआधी स्टार किड्स वरुण धवन आणि आलिया भट्ट ही जोडी 'स्टुडेंट ऑफ द इअर' दिसली.
ईशान आणि साराच्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, या सिनेमात करीना कपूर आयटम साँग करण्याची शक्यता आहे. सिनेमाचा निर्माता कोण असेल त्याबाबत काही माहिती नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.