नवी दिल्ली : बॉलिवूडचा 'नवाब' सैफ अली खानने ट्रीपल तलाख आणि सोनू निगमच्या लाऊडस्पीकर मुद्द्यावर आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे.
सैफ अली खान इंडियन एक्स्प्रेसच्या एका कार्यक्रमात बोलत होता. त्याने लाऊडस्पीकर वादावर आपले म्हणणे मांडले. अल्पसंख्यक म्हणून जगात आपल्याला आपल्या अस्तित्त्वाची जाणीव करू द्यावी लागते. आपले अस्तित्व लोकांना स्वीकर करावे असे वाटत असते.
मी या गोष्टीशी सहमत आहे की जितका आवाज कमी तितका चांगले आहे. मी समजू शकतो की अजानवेळी आवाज वाढविल्यान एकप्रकारची असुरक्षेची भावना निर्माण होऊ शकते.
सैफ म्हणाला अशात कोणी अजानची आवाज कमी करण्यास सांगितले तर त्यावर लोक भडकणे स्वाभाविक आहे. पण सोनू निगमने तक्रार करण्यासाठी जो मार्ग निवडला तो चुकीचा होता. असेही सैफ अली खान म्हणाला.
मुस्लिम महिलांसाठी हक्काची आणि स्वाभिमानाचा मुद्दा ठरलेला 'ट्रिपल तलाक' सध्या चर्चेचा विषय ठरतोय. याच मुद्द्यावर अभिनेता सैफ अली खाननंही आपली मतं मांडलीत.
आपण 'ट्रिपल तलाक'च्या प्रथेशी सहमत नसल्याचं स्पष्ट मत सैफनं व्यक्त केलंय. सैफनं पहिली पत्नी अमृता सिंग हिच्याशी निकाह केला होता... परंतु, 'तलाक' मात्र कायदेशीर पद्धतीनंच घेतला. करीनाशीही भारत सरकारनं केलेल्या तरतुदींनुसारच विवाह केला. 'माझ्यावर माझ्या मुलांची जबाबदारी होती. मी कधीच ट्रीपल तलाकच्या प्रथेला मानलं नाही... आणि म्हणूनच मी तलाकही यापद्धतीनं घेतला नाही' असं सैफनं म्हटलंय.
जगभरात कट्टर इस्लामविषयी वाढत्या भीतीबद्दलही सैफनं आपलं मत मांडलंय. 'मला माझ्या ओळखीमुळी कधीही अडचणींचा सामना करावा लागला नाही. परंतु, जगभरात इस्लामबद्दल जी भीती आणि तिरस्कार वाढतोय, तो चिंताजनक आहे' असंही सैफनं म्हटलंय.