मुंबई : टेनिसचा बादशाह रॉजर फेडररला आमीरचा पीके सिनेमा पाहायचा आहे. या सिनेमाविषयी रॉजरला प्रचंड उत्सुकता आहे. आमीरचा पीके सिनेमा बहुचर्चित झाला आहे, यातील गाणी आणि काही दृश्य सोशल नेटवर्किंग साईटवर लोकप्रिय झालेले आहेत.
येत्या १९ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होत असून तो पाहिल्यावर आपल्या चाहत्यांची तसेच फेडररची काय प्रतिक्रिया येते, याकडेच आमिरचे लक्ष असेल. चित्रपटाचे पहिले पोस्टर पाहिले असून आता हा चित्रपट कसा असेल याबद्दल आपण उत्सुक असल्याचे फेडरर आमिरला म्हणाला, अशी माहिती आमीरच्या प्रवक्त्याने दिली.
मि.परफेक्शनिस्ट आमिर खानच्या 'पीके' या चित्रपटाची त्याचे चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पहात आहेत. वर्षभरात अवघा एकच चित्रपट करणारा आमिर चाहत्यांना दरवेळेस काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो.
इंटरनॅशनल प्रीमिअर लीगच्या निमित्ताने फेडरर नुकताच भारतात येऊन गेला. अनेक बॉलिवूड स्टार्सनी या लीगला उपस्थिती लावली होती, त्यात आमिरचाही समावेश होता. त्या दोघांनी मिळून एक सामनाही खेळला, त्यावेळी त्यांच्यात छान गप्पाही रंगल्या होत्या. त्याचवेळी फेडररने आमिरला 'पीके' चित्रपट पहायची मला खूप उत्सुकता आहे असे सांगितले.
येत्या १९ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होत असून तो पाहिल्यावर आपल्या चाहत्यांची तसेच फेडररची काय प्रतिक्रिया येते, याकडेच आमिरचे लक्ष असेल. चित्रपटाचे पहिले पोस्टर पाहिले असून आता हा चित्रपट कसा असेल याबद्दल आपण उत्सुक असल्याचे फेडरर आमिरला म्हणाला, अशी माहिती आमीरच्या प्रवक्त्याने दिली.
'हातात फक्त रेडिओ धरून उभा असलेला आमिर' या 'पीके'च्या पहिल्या पोस्टरमुळे अनेक वाद निर्माण झाले होते, तसेच त्याच्या चाहत्यांची चित्रपटाविषयी उत्सुकताही वाढली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.