अभिनेत्री मुनमुन, रिया सेन यांचं घर जळून खाक

अभिनेत्री मुनमुन सेन यांच्या घराला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली, मुनमुन सेन यांचं घर मुंबईतील अंधेरी भागात आहे.  आगीत सेन यांचं घर जळून खाक झालं आहे. यावेळी घरामध्ये त्यांची मुलगी अभिनेत्री रिया सेनही होती. 

Updated: Apr 12, 2015, 10:04 AM IST
अभिनेत्री मुनमुन, रिया सेन यांचं घर जळून खाक title=

मुंबई : अभिनेत्री मुनमुन सेन यांच्या घराला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली, मुनमुन सेन यांचं घर मुंबईतील अंधेरी भागात आहे.  आगीत सेन यांचं घर जळून खाक झालं आहे. यावेळी घरामध्ये त्यांची मुलगी अभिनेत्री रिया सेनही होती. 

अग्निशामन दलाच्या जवानांनी खूप प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविले.  सेन कुटुंब शनिवारी रात्री झोपेत असतांना,  एसीमधून आगीला सुरवात झाली. आग लागल्याचे समजताच सेन कुटुंबीय घराबाहेर पडले. आग नंतर पसरत जाऊन पूर्ण घर खाक झाले. 

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अंधेरीतील रुईया पार्क बिल्डिंगमध्ये सहाव्या मजल्यावर मुनमुन सेन यांचे कुटुंब राहते. घरातील इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, फर्निचर सर्व जळून खाक झाले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.