मुंबई : सनी लियोनचा सिनेमा 'एक पहेली लीला' प्रेक्षकांच्या चांगलाच पसतीला उतरताना दिसतोय. या सिनेमानं पहिल्याच दिवशी कमाईच्या बाबतीत अनुष्का शर्मा, बिग बी आणि सुशांत सिंह यांच्या सिनेमांनाही पाणी पाजलंय.
'एक पहेली लीला' या सिनेमानं शुक्रवारी पहिल्याच दिवशी तब्बल ५.३० कोटींची कमाई केली य. विकेंन्डपर्यंत हा सिनेमा १५ ते २० कोटी कमाई करू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.
अनुष्का शर्मा हिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'एनएच १०'नं पहिल्या दिवशी ३.३५ कोटी, बिग बींच्या 'शमिताभ'नं ३.५० कोटी, तर सुशांत सिंहच्या 'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी'नं ४.२० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे सनीच्या 'एक पहेली लीला'नं या सर्वांना मागं टाकल्याचं स्पष्ट दिसतंय.
सिनेमात सनी लिओन डबल रोलमध्ये दिसतेय. गावकडील एक साधारण मुलगी आणि शहरातील मॉडर्न बेब अशा दोन्ही अवतारांत सनी या सिनेमांत पाहायला मिळतेय. सिनेमात सनीसोबत जय भानुशाली, रजनीश दुग्गल, राहुल देव मुख्य भूमिकेत आहेत. बॉबी खानने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.