Revealed ! 2016 मध्ये सलमानची फी 100 कोटी

बॉलीवूडचा दंबग खान आता काही दिवसातच किंग खानला मागे ठाकणार आहे. कमाईच्या बाबतीत किंग खान हा नेहमीच पुढे होता पण सलमानने आता त्याला मागे टाकलं आहे.

Updated: Jan 19, 2016, 08:17 PM IST
Revealed ! 2016 मध्ये सलमानची फी 100 कोटी title=

मुंबई : बॉलीवूडचा दंबग खान आता काही दिवसातच किंग खानला मागे ठाकणार आहे. कमाईच्या बाबतीत किंग खान हा नेहमीच पुढे होता पण सलमानने आता त्याला मागे टाकलं आहे.

ज्याच्या सिनेमाची कोणीही हमी देतो अशा सलमान खानने आता त्याची फी पाढवली आहे. सलमान खान २०१६ मध्ये सर्वाधिक फी घेणारा अभिनेता बनू शकतो. सलमान खान आता एका सिनेमासाठी तब्बल १०० कोटी रुपये घेऊ शकतो. आगामी सुल्तान सिनेमासाठी त्याने १०० कोटी घेतले आहेत. 

यशराज फिल्मच्या रेस्लिंग सिनेमासाठी ही त्याने बरोबरीने म्हणजे ५०-५० टक्के कमाई घेण्याचा सौदा केला आहे. या सिनेमासाठी सलमानचे फक्त ८० दिवस मागितले आहे. 

२०१४ मध्ये आलेल्या किक सिनेमासाठी सलमानने ४८ कोटीचे सॅटेलाईट अधिकार, आणि १२ कोटींचे संगीत अधिकार घेतले होते. प्रेम रतन धन पायो या सिनेमासाठी त्याने ४८ कोटी घेतले होते. 

सलमान खानला १०० कोटी देऊनही निर्मात्यांना मोठा फायदा होतो. त्यामुळे सलमानसाठी १०० कोटीही मोजायला निर्माते तयार होतील.