परिणिती चोप्रा 'धूम ४' मध्ये?

मुंबई: परिणिती चोप्रा आता 'धूम ४' मध्ये ऋ्तिक रोशन सोबत काम करताना दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

Updated: Jan 19, 2016, 07:09 PM IST
परिणिती चोप्रा 'धूम ४' मध्ये? title=

मुंबई: परिणिती चोप्रा आता 'धूम ४' मध्ये ऋ्तिक रोशन सोबत काम करताना दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण तशा बातम्या सध्या सर्वांच्या भुवया उंचावतायत. परिणिती २०१४ मध्ये शेवटची पडद्यावर झळकली होती.

काही दिवसांपूर्वी बातम्या आल्या होत्या की परिणिती 'सुलतान' मध्ये सलमान सोबत झळकणार आहे. त्यानंतर ती फराह खानच्या फिल्ममध्ये काम करत असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. पण, या सर्व अफवा असल्याचं ती म्हणाली होती.

एका इंग्रजी मासिकानुसार परिणितीला एक बिग बॅनर सिनेमा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी तिने एक हॉट फोटोशूटही केलं होतं ज्यात ती स्लिम-ट्रीम दिसत होती. तिने शरीरावर मेहनत घेतल्याचंही जाणवत होतं. त्यामुळे धूम साठीच होतं का असा संशय व्यक्त केला जात आहे.

धूम सिरीजमध्ये यापूर्वी रिमी सेन, इशा देवोल, ऐश्वर्या राय, बिपाशा बासू या अभिनेत्री झळकल्या आहेत. या सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. आता प्रेक्षक परिणितीला पसंत करतात का ते पाहाणे उत्सुकतेचे ठरेल.