मुंबई : सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा आपल्या लग्नाच्या बातमीने चर्चेत आला आहे. यावेळी भारतातून नाही तर रोमानियातून ही बातमी आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार बुखारेस्ट (रोमानिया) मध्ये लुलिया वंतूरच्या पीआरने दावा केला की लुलियाने सुपरस्टार सलमानशी एन्गेजमेंट केली आहे आणि पुढील वर्षी ते लग्न करणार आहेत.
लुलिया पाच आठवड्यांपूर्वी बुखारेस्ट पोहचली होती. मीडिया रिपोर्टनुसार याच काळात लुलिया आणि सलमान या दोघांनी गुपचूप एन्गेजमेंट केली आहे. या वर्षी मे महिन्यात बातमी आली होती की सलमान आणि लुलिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षाच्या अखेरीस लग्न होणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान, सलमानच्या निकटवर्तींयांनी या बातमीला अफवा असल्याचे सांगितले आहे.
सलमान आणि लुलियाच्या एन्गेजमेंटची बातमी रोमानियन वेबसाइट www.wowbiz.ro देण्यात आली आहे. यात लुलियचा एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. त्यात लुलियाच्या बोटांमध्ये रिंग दिसत आहे. या अंगठीमुळे तिचा आणि सलमानचा साखरपुडा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.