मुंबई: ‘नटरंग’,‘बीपी, ‘टिपी’ यांसारख्या दर्जेदार सिनेमांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक रवी जाधव यांच्या पहिल्यावहील्या हिंदी ‘बॅन्जो’ या सिनेमाच्या शूटींग लवकरच सुरू होणार आहे. क्लॅप्स अॅन्ड स्लॅप्स या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, महत्वाची गोष्ट म्हणजे रवी जाधव यांच्या पहिल्याच हिंदी सिनेमात अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री नर्गीस फाखरी यांच्या यात मुख्य भूमिका असणार आहे.
रवी जाधव हे मराठी सिने इंडस्ट्रीतील एक आघाडीचे दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सिनेमांनी मराठी सिनेमाला एक वेगळी दृष्टी प्रदान केली आहे. आता रवी जाधव हे त्यांच्या पहिल्या हिंदी सिनेमाचं शूटींग सुरू करीत आहेत. या सिनेमात रितेश आणि नर्गीस सारखी मोठी कलाकार मंडळी असल्यानेही या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे.