हॉलिवूडसाठी दीपिकाला रणवीरकडून 'ऑल द बेस्ट'!

रणवीरनं पुन्हा एकदा स्वत:ला बेस्ट बॉयफ्रेंड असल्याचं सिद्ध केलंय, असं म्हणायला हरकत नाही. 

Updated: Feb 9, 2016, 05:39 PM IST
हॉलिवूडसाठी दीपिकाला रणवीरकडून 'ऑल द बेस्ट'! title=

मुंबई : रणवीरनं पुन्हा एकदा स्वत:ला बेस्ट बॉयफ्रेंड असल्याचं सिद्ध केलंय, असं म्हणायला हरकत नाही. 

दीपिका पादूकोण ही सध्या तिचा हॉलिवूडचा चित्रपट 'xXx : द रिटर्न ऑफ क्झंडर केज'च्या चित्रिकरणात व्यस्त आहे. कॅनडामध्ये याचं शूट पार पडतंय. या चित्रपटात ती विन डिझेल याच्यासोबत दिसणार आहे.

पण, इकडे रणवीर मात्र तिला खूप मिस करतोय. पण, त्याला दीपिकाचा अभिमानही वाटतोय. त्यामुळेच त्यानं या सिनेमाचं प्रमोशनही सुरू केलंय... तेही त्याच्या वेगळ्याच अंदाजात... 

रणवीरनं सोशल वेबसाईटवर एका टॅक्सीसमोर उभं राहिलेला आपला एक फोटो शेअर केलाय. या टॅक्सीमागे xXx अशी अक्षरं लिहिलेली आहेत... या फोटोसोबतच रणवीरनं दीपिकाला 'बेस्ट ऑफ लक' असंही म्हटलंय. 

 

Check it out! Already a rage in India! 󾌴 #XXX Deepika Padukone all the best for your 1st day of shoot! Kill it!

Posted by Ranveer Singh on Tuesday, February 9, 2016