किंग खानला पाहून रणवीर सिंगला आली चक्कर

बॉलिवूडचा किंग खान हा फक्त प्रेक्षकांवरच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांच्या हृद्यावर देखील राज करतो. शाहरुख खानला मानणारे अनेक स्टार बॉलिवूडमध्ये आहेत.

Updated: Mar 12, 2016, 03:17 PM IST
किंग खानला पाहून रणवीर सिंगला आली चक्कर title=

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान हा फक्त प्रेक्षकांवरच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांच्या हृद्यावर देखील राज करतो. शाहरुख खानला मानणारे अनेक स्टार बॉलिवूडमध्ये आहेत.

अभिनेता रणवीर सिंग हा देखील किंग खानचा फॅन आहे आणि सध्या तो फॅन चित्रपटाचं प्रमोशन करतांना दिसतोय. फॅन गाण्याचा डबस्मॅश करुन त्याने तो व्हिडिओ इन्स्टग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओसोबत त्याने 'सर्व प्रकारच्या मोशन पोस्टर्सचा बाप' असं लिहिलं आहे.

रणवीर सिंग जबरा फॅन गाण्यावर नाचत असतो आणि मागून शाहरुख येताच त्याला पाहून रणवीर बेशुध्द होतो.

रणवीर सिंग नेहमी काही तरी वेगळं करत असतो. त्याचा हा वेगळा डबस्मॅश देखील तुम्हाला नक्की आवडेल.