सलमानच्या डोक्यात खूर्ची घालण्याच्या वक्तव्यावर रणवीर बोलला

सुल्तान हा चित्रपट पाहताना 'बेबी को बास पसंद है' या गाण्यावर थिएटरमध्येच रणवीर सिंग नाचला होता.

Updated: Jul 23, 2016, 05:36 PM IST
सलमानच्या डोक्यात खूर्ची घालण्याच्या वक्तव्यावर रणवीर बोलला  title=

मुंबई : सुल्तान हा चित्रपट पाहताना 'बेबी को बास पसंद है' या गाण्यावर थिएटरमध्येच रणवीर सिंग नाचला होता. पॅरिसमध्ये रणवीर त्याचा आगामी चित्रपट बेफिक्रेचं शूटिंग करत होता. तेव्हा त्यानं सुल्तान पाहिला. 

रणवीरचा हा डान्स बघून मला त्याच्या डोक्यात खूर्ची घालावीशी वाटली, कारण तो प्रेक्षकांना चित्रपट बघून देत नव्हता, असं सलमान म्हणाला होता. रणवीरनं बसून चित्रपट बघायला पाहिजे होता, असं अनुष्का शर्मा म्हणाली होती. 

सलमानच्या या वक्तव्यावर रणवीर सिंगनं प्रतिक्रिया दिली आहे. इरफान खानच्या मदारी चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी रणवीरला सलमानच्या त्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आज मदारीसाठी इकडे आलो आहे, त्यामुळे दुसऱ्या कोणत्या चित्रपटाविषयी न बोललेलंच बरं, असं रणवीर म्हणाला आहे.