मुंबई : दीपिका पादूकोण सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा वेळ व्यतीत करण्यासाठी गेलीय. हा वेळ ती आपल्या कुटुंबीयांसोबत मस्त मजेत घालवतेय... असं असलं तरी नवीन वर्षाची सुरुवात ती रणवीरसोबतच करणार आहे.
दीपिकानं ख्रिसमस सेलिब्रेशन आपल्या कुटुंबीयांसोबत केलंय तर नवीन वर्षाच्या स्वागत ती अभिनेता रणवीर सिंगसोबत प्लान करतेय.
एका वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, रणवीर आणि दीपिका या दोघांनीही २७ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत आपलं काम थांबवलंय... या वेळेत या दोघांनाही ब्रेक हवाय.
रणवीर सिंग लवकरच 'बाजीराव-मस्तानी' या त्याच्या आगामी सिनेमात दिसणार आहे... या सिनेमाच्या शुटींगमधून ब्रेक घेऊन तो दीपिकाची सोबत करण्यासाठी पोहचणार आहे... आणि मालदीवहून हे दोघेही लव्हबर्डस दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जाऊन न्यू इअरचं सेलिब्रेशन करणार आहेत.
आपल्या बिझी शेड्युलमधून एकमेकांसाठी वेळ काढण्याची दीपिका आणि रणवीरची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही 'दिल धडकने दो' या सिनेमाचं शुटींग सुरू असताना दीपिकानं बार्सिलोनामध्ये अचानक धडकून रणवीरसह सगळ्यांनाच सरप्राइज दिलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.