व्हेलेन्टाईन - शिवजयंतीचा मुहूर्त साधून प्रदर्शित होतोय 'रांजण'

प्रेमाला कुठलंही बंधन नसतं... अशा बंधमुक्त प्रेमाचं 'रांजण' १७ फेब्रुवारीला भरणार आहे. 

Updated: Feb 9, 2017, 09:42 AM IST
व्हेलेन्टाईन - शिवजयंतीचा मुहूर्त साधून प्रदर्शित होतोय 'रांजण'  title=

मुंबई : प्रेमाला कुठलंही बंधन नसतं... अशा बंधमुक्त प्रेमाचं 'रांजण' १७ फेब्रुवारीला भरणार आहे. 

श्री महागणपती एन्टरटेन्मेंट निर्मित या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये  'रांजण'विषयी मोठी उत्सुकता आहे.

चित्रपटसृष्टीत प्रेमकथा खूप वेगवेगळ्या पद्धतीनं मांडण्यात आल्या आहेत. काळ कुठलाही असला, तरी प्रेक्षकांकडून प्रेमकथांना नेहमीच पसंती मिळालेली आहेत. 'रांजण'मध्ये एक शाळकरी मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेमाची कथा आहे. मात्र, ही कथा प्रेम, आकर्षण या भावनांच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक विचार मांडते, मुलभूत गोष्टींवर भाष्य करते. मुलांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही त्यातून व्यक्त होतो. या चित्रपटात यश कुलकर्णी आणि गौरी कुलकर्णी त्यांच्याह पुष्कर लोणारकर, अनिल नगरकर, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, विद्याधर जोशी यांच्याही भूमिका आहेत.

या चित्रपटातील 'लागीर झालं रं' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहेत. वैभव जोशी यांनी गीतलेखन आणि नरेंद्र भिडे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातील गाणी अजय गोगावले, अवधूत गुप्ते, नंदेश उमप, आदर्श शिंदे व दीपाली जोग यांनी गायली आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x