मुंबई : कोब्रासोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने टीव्ही अभिनेत्री श्रुती उल्फत हिला अटक करण्यात आलीये. वन विभागाने ही कारवाई केलीये. तिच्यासह आणखी एक अभिनेत्री आणि दोन प्रॉडक्शन मॅनेजर्सनाही अटक करण्यात आलीये.
वन्य जीव अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीये. डीएनएच्या बातमीनुसार मुंबई प्रादेशिक वन अधिकाऱ्यांनी वन्य जीव प्रेमींच्या तक्रारीनंतर याप्रकरणी केस फाईल केली. व्हिडीओ ऑक्टोबर २०१६मध्ये नागार्जुन सीरियलच्या प्रमोशनसाठी बनवण्यात आला. श्रुतीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.
दरम्यान, प्रॉडक्शन टीमने हा कोब्रा स्पेशल इफेक्टने बनवला असून तो जिवंत नसल्याचा दावा केला होता. मात्र १७ जानेवारीला मिळालेल्या रिपोर्टनुसार हा साप खरा होता. रिपोर्टच्या आधारे अभिनेत्रीला नोटीस पाठवण्यात आली.
दरम्यान, बुधवारी दोन्ही अभिनेत्री तसेच दोन्ही प्रॉडक्शन मॅनेजर्सना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. यात यांनी व्हिडीओमधील कोब्रा जिवंत असल्याचे कबूल केलेय. त्यानंतर त्यांना कोर्टात नेण्यात आले जेथे त्यांना एक दिवसांची कोठडी मिळालीये.
Ths is d video that got Shruti Ulfat in trouble nd angered animal activists who complained 2 forest dept @PAWSMumbai @RAWW_TWEETS @dna pic.twitter.com/FBdAwfTXFU
— Virat A Singh (@singhvirat246) 8 February 2017
Forest Dept say that production manager nd actress said this snake was special effect bt forensic tests cnfrmd it was real @dna pic.twitter.com/DIfosxGhZO
— Virat A Singh (@singhvirat246) 8 February 2017