मुंबई : अभिनेत्री रानी मुखर्जी आणि सिनेनिर्माता आदित्य चोपडा यांच्या घरी आज एका चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालंय. रानी - आदित्यचं हे पहिलंच अपत्य आहे.
आदित्या चोपडा याचा छोटा भाऊ उद्य चोपडा आणि मित्र करन जोहर यांनी ट्विटरवरून ही बातमी दिलीय. 'मुलगी' असं ट्विट करत उदयनं चिमुकलीचं स्वागत केलंय.
IT’S A GIRL!!!!!
— Uday Chopra (@udaychopra) December 9, 2015
तर 'मी एका सुंदर चिमुकलीचा काका बनलोय. रानी आणि आदित्यच्या घरी मुलगी जन्माला आलीय' असं म्हणत करन जोहरनं आपला आनंद ट्विटरवर व्यक्त केलाय.
Am an uncle to a beautiful baby girl today!!!!! @udaychopra !!! Rani and Adi had a baby girl!!
— Karan Johar (@karanjohar) December 9, 2015
रानी (३६) आणि आदित्य (४२) गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात गुपचूप पद्धतीनं विवाहबंधनात अडकले होते. हे रानी मुखर्जीचं पहिलंच लग्न आहे तर आदित्यचा हा दुसरा विवाह आहे. आदित्यचा त्याची पहिली पत्नी पायल खन्ना हिच्याशी २००९ साली घटस्फोट झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.