सिनेमापेक्षा मला ‘बेबी’ प्रोड्युस करायचंय - राणी मुखर्जी

नवविवाहित बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिला आईपणाचे वेध लागलेत... ‘डीएनए’ या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत खुद्द रानीनंच हे उघडपणे मान्य केलंय. 

DNA | Updated: Jul 16, 2014, 03:47 PM IST
सिनेमापेक्षा मला ‘बेबी’ प्रोड्युस करायचंय - राणी मुखर्जी title=

मुंबई : नवविवाहित बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिला आईपणाचे वेध लागलेत... ‘डीएनए’ या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत खुद्द राणीनंच हे उघडपणे मान्य केलंय. 

तसं पाहिलं तर, बॉलिवूड बेब्स आपल्या करिअरसाठी प्रेम, लग्न, घर-संसार, मुलं या सगळ्यांना दुय्यम स्थान देताना दिसतात... यामध्ये त्यांचं करिअर किती जोरावर आहे, याला मात्र मोजमाप गृहीत धरलं जात नाही. पण, राणीनं मात्र या सगळ्यांना फाटा देत आपल्याला आता आईपणाचं सुख घ्यायचंय, असं म्हटलंय. 

काही दिवसांपूर्वीच आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांनी लग्न केलंय. त्यानंतर राणी आता आदित्यचा स्टुडिओ ‘यश राज फिल्म्स’ची सूत्रं काही प्रमाणात आपल्याकडे घेईल अशी चर्चा सुरू आहे. पण, राणीनं मात्र याला साफ नकार देत आपल्या खाजगी जीवनाला जास्त महत्त्व दिलंय.   

‘केवळ माझ्या लग्नामुळे स्टुडिओमध्ये बदल व्हावेत, अशी काही गरज निर्माण झालेली नाही. स्टुडिओ याआधीही चांगला सुरू होता आणि यापुढेही राहील. माझं तिथं असणं किंवा नसणं याचा तिथं फारसा फरक पडणार नाही. मी ‘आदि’ची पत्नी आहे आणि बॉलिवूडशी संबंधित आहे म्हणून जर कुणी मला सल्ला मागितला तर मी नक्कीच देईल. कारण तो माझ्या पतीचा स्टुडिओ आहे... पण, मला वाटतं तिथं सध्या ही कामं उत्तम पद्धतीनं हाताळणारी खूप लोक आहेत’ असं राणीनं म्हटलंय.   
मग, यश राज फिल्म्स बॅनरखाली एखादा सिनेमा प्रोड्युस करण्याबद्दल काय मत आहे असं जेव्हा राणीला विचारलं गेलं तेव्हा तिनं जोरात हसत ‘मला आता बाळ प्रोड्युस करायचंय’ (I want to produce children now) असं उत्तर दिलं. 

‘बाळासाठी पंजाबी सासूकडून माझ्यावर कोणतीही जबरदस्ती नाही... पण, मलाच आता बाळ हवंय... माझे मित्र मला नेहमी चिडवताना म्हणतात ‘राणीचा जन्मच आई बनण्यासाठी झालाय’... आणि मलाही असंच वाटतंय... मला माझं कुटुंब निर्माण करायचंय... आणि आता यासाठी मला उशीर करायचा नाहीय... आणि आई बनणं म्हणजे एखाद्या स्त्रीसाठी मला खूप मोठी अचिव्हमेंट वाटते... यामध्ये ती काहीतरी नवनिर्मिती करत असते... आणि मलाही हा अनुभव घ्यायचाय’ असंही राणीनं यावेळी म्हटलंय.   

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.