पाहा... प्रियांकाच्या ‘मेरी कॉम’चा फर्स्ट लूक!

 बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉक्सर ‘मेरी कॉम’ हिच्या जीवनावर आधारित कथा मोठ्या पडद्यावर साकार करतेय. याच सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर दाखल झालाय.

Updated: Jul 15, 2014, 08:42 AM IST
पाहा... प्रियांकाच्या ‘मेरी कॉम’चा फर्स्ट लूक! title=

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉक्सर ‘मेरी कॉम’ हिच्या जीवनावर आधारित कथा मोठ्या पडद्यावर साकार करतेय. याच सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर दाखल झालाय.

प्रियांकानं सोशल वेबसाईट ट्विटरच्या माध्यमातून हा फर्स्ट लूक लोकांसमोर सादर केलाय. ऑलिम्पिक मेडल विजेती आणि तब्बल पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या भारतीय महिला बॉक्सर मेरी कॉम हिच्या जीवनावर हा सिनेमा आधारलेला आहे. 

प्रियांकाचा हा लूक प्रेक्षकांना जबरदस्त भावलेला दिसतोय. अनेक चाहत्यांनी तिचं हे ट्विट शेअर केलंय. एका बॉक्सरच्या रुपात दणकट प्रियांका यात पाहायला मिळतेय. या लूकसाठी प्रियांकानं खूप मेहनतदेखील घेतलीय, हे विसरता कामा नये. 

या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत ओमुंग कुमार तर निर्माते आहेत संजय लीला भन्साळी. येत्या 5 सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.