प्रियांका चोप्राचा बेवॉच या हॉलिवूड सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूडची देसी गर्ल  प्रियांका चोप्राच्या बेवॉच या हॉलिवूड सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 11, 2017, 08:04 PM IST
प्रियांका चोप्राचा बेवॉच या हॉलिवूड सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित title=

न्यूयॉर्क : बॉलिवूडची देसी गर्ल  प्रियांका चोप्राच्या बेवॉच या हॉलिवूड सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

दुसऱ्या ट्रेलरमध्ये प्रियांकाने साकारलेल्या व्हिक्टोरिया लीड्स या व्यक्तिरेखेची झलकही पाहायला मिळते आहे. प्रियांकाचा खलनायकी चेहरा या ट्रेलरमध्ये अनेकांचेच लक्ष वेधून घेत आहे.
 
‘ड्वेन जॉन्सन, झॅक एफ्रॉन, अलेक्झांड्रा डॅडारिओ, जॉन बॉस यांच्याही या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.  पहिल्या ट्रेलरमध्ये प्रियांकाच्या दिसलेल्या ओझरत्या दर्शनामुळे चाहते नाराज झाले होते. मात्र दुस-या ट्रेलरमध्येही कसर भरुन निघाली आहे.