अमृता खानविलकरला केले १२ वर्षाच्या मुलाने प्रोपोज

कलर्स मराठी वर सुरु झालेल्या 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर  च्या सेटवर . पुण्यातला श्री दळवी या फक्त १२ वर्षाच्या मुलाने अमृता हिला प्रोपोज केले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 11, 2017, 06:20 PM IST
 अमृता खानविलकरला केले १२ वर्षाच्या मुलाने प्रोपोज title=

मुंबई : कलर्स मराठी वर सुरु झालेल्या 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर  च्या सेटवर . पुण्यातला श्री दळवी या फक्त १२ वर्षाच्या मुलाने अमृता हिला प्रोपोज केले.
 
श्री दळवीतील निरागसता आणि नृत्य याच्या प्रेमात परीक्षक पडले. डांस ऑडीशन दरम्यान त्याने संपूर्ण डांस अमृताकडे बघून केला आणि जेंव्हा उमेश जाधव यांनी त्याला विचारले की, तू अस का केले तेंव्हा त्याने अतिशय निरागस रीत्या अमृताला प्रोपोज केले तो म्हणाला “तू मला लय आवडते” आणि त्यावर अमृता देखील I Love you too म्हणाली आणि त्याच्या बरोबर डांस देखील केला. उमेश जाधव यांनी त्याला आपल्या अंदाजात comments देखील दिल्या.
 
याच मंचावर मुंबईमधील तुषार खेराडे हा स्टेजवर येताच अमृताकडे बघून म्हणाला तुम्हाला बघायचं होत आणि इतकेच नव्हे तर तो अमृताला बघून खूप खुश झाला. 

आपण ज्या व्यक्तीला आपला idol मानतो तिला भेटल्यावर अथवा तिच्यासमोर डांस करण्याची संधी मिळाल्यावर भारावून जाणे हे सहाजिक आहे, तसच काहीस तुषारच देखील झाले.