चेन्नई : प्रकाश राज यांना ओळखीची गरज नाही, सिंघम मधील जयकांत शिकरे ही व्यक्ती रेखा अजरामर करणाऱ्या प्रकाश राज यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
प्रकाश राज यांनी आज सकाळी ट्विटरवरून आपला आनंद व्यक्त केला. त्यांना ५० वर्षी मुलगा झाला. त्यांनी ट्विटरवर ट्विट करताना सांगितले की, हाय... मी आणि पोनी हा आनंदाचा क्षण तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. आमच्या घरात गोंडस मुलाने जन्म घेतला आहे. त्याला आशीर्वाद द्या... चिअर्स...
Hi .. Me and pony are happy share with you this moment of joy in our life.. We had a lovely baby boy.. Today .. Bless him. Cheers
— Prakash Raj (@prakashraaj) February 3, 2016
प्रकाश राज यांनी दाक्षिणात्य सिनेमासोबत बॉलीवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. प्रकाश राज यांनी कोरिओग्राफ पोनी वर्मा हिच्याशी लग्न केले आहे.
दक्षिणेतील फिल्म इंडस्ट्रीत ही बातमी पसरल्यावर प्रकाश राज यांचे सर्वांनी ट्विटरवर अभिनंदन केले. त्यात अभिनेता सलमान खान, सिद्धार्थ, तापसी पन्नू यांचा समावेश आहे.
प्रकाश राज यांना पहिली पत्नी ललिथा कुमारपासून दोन मुली आहेत. पोनी शर्मा ही त्यांची दुसरी पत्नी असून त्यांनी २०१०मध्ये लग्न केले होते.