मुंबई : तन्मय भट्टने तयार केलेला वादग्रस्त व्हिडीओ इंटरनेटवरून हटवणार असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. आपण फेसबुक, यू-ट्यूब आणि ट्वीटरच्या संपर्कात असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.
भारतरत्न लता मंगेशकर तसेच सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात अश्लील आणि खालच्या पातळीचे विनोद केल्याने, तन्मय भट्टला सर्वांकडून खडे बोल सुनावले जात आहेत.
एआयबी या कार्यक्रमासाठी तन्मय भट्ट काम करतो, यापूर्वी देखील तन्मय भट्टने अश्लाघ्य आणि खालच्या पातळीवर विनोद केले होते, यामुळेच हा कार्यक्रम प्रसिद्धीची झोतात आला.