पंतप्रधान मोदींवर बनणार सिनेमा, हा अभिनेता करणार रोल

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक सिनेमांचा ट्रेंड सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच २ अशा सिनेमांची घोषणा झाली आहे. आता आणखी एका बायोपिकबाबत माहिती समोर येत आहे. हा खुलासा केला आहे अभिनेते परेश रावल यांनी.

Updated: May 13, 2017, 09:16 AM IST
पंतप्रधान मोदींवर बनणार सिनेमा, हा अभिनेता करणार रोल title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक सिनेमांचा ट्रेंड सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच २ अशा सिनेमांची घोषणा झाली आहे. आता आणखी एका बायोपिकबाबत माहिती समोर येत आहे. हा खुलासा केला आहे अभिनेते परेश रावल यांनी.

ट्विटरवर एका प्रश्नाचं उत्तर देतांना परेश रावल यांनी हे नक्की केलं की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनणाऱ्या सिनेमाचा भाग असणार आहेत.
 
गुजरात विधानसभा निवडणुकीत परेश रावल यांनी नरेंद्र मोदींचे समर्थन करत अनेक सभा घेतल्या होत्या. सध्या ते मोदींच्या खूपच जवळचे देखील मानले जातात. त्यांनी एकदा असं देखील म्हटलं होतं की, माझ्या अॅक्टिंगच्या करिअरमध्ये नरेंद्र मोदींचा रोल करणं एक निर्णायक आणि वेगळीच छाप सोडणार क्षण असेल.