कॉमेडी नाईटसच्या 'पलक'ला अटक

कॉमेडी नाईटस विद कपिलमध्ये 'पलक' नावाची भूमिका निभावणारा अभिनेता किकू शारदा याला पोलिसांनी अटक केलीय. 

Updated: Jan 13, 2016, 11:21 AM IST
कॉमेडी नाईटसच्या 'पलक'ला अटक title=

नवी दिल्ली : कॉमेडी नाईटस विद कपिलमध्ये 'पलक' नावाची भूमिका निभावणारा अभिनेता किकू शारदा याला पोलिसांनी अटक केलीय. 

कॉमेडियन किकूनं आपल्या कार्यक्रमात डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह यांची हेटाळणी केल्याचा आरोप करण्यात आलाय. यानंतर बाबांच्या भक्तांनी त्याच्यावर धार्मिक भावना भडकावण्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. 

त्यानंतर पोलिसांनी किकूला मुंबईच्या गोरेगावमधून अटक केलीय. किकू शारदाला अटक करण्यासाठी हरियाणा पोलिसांचा एका अधिकारी ४ पोलिसांसहीत मुंबईला गेले होते. अटकेनंतर आज सकाळी किकूला दिल्लीत आणण्यात आलं.