फिल्म 'रईस' मध्ये शाहरुखसोबत पाक अभिनेत्री माहिरा

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान, अभिनेत्री हुमैमा मलिक यांच्यानंतर अभिनेत्री माहिरा खान बॉलीवूडमध्ये एन्ट्री करत आहे. माहिराचा डेब्यू शाहरूख खान सोबत 'रईस' चित्रपटातून होणार आहे. 

Updated: Dec 16, 2014, 03:44 PM IST
 फिल्म 'रईस' मध्ये शाहरुखसोबत पाक अभिनेत्री माहिरा title=

मुंबई : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान, अभिनेत्री हुमैमा मलिक यांच्यानंतर अभिनेत्री माहिरा खान बॉलीवूडमध्ये एन्ट्री करत आहे. माहिराचा डेब्यू शाहरूख खान सोबत 'रईस' चित्रपटातून होणार आहे. 

माहिरा खान देखील हुमैमा मलिक प्रमाणे २०११मध्ये आलेल्या पाकिस्तानी चित्रपट बोलनंतर लाइमलाइटमध्ये आली होती. सध्या माहिराची 'हमसफर' ही सिरीअल भारतात प्रसिद्ध झाले आहे. तिला लोकांची पसंती मिळाली आहे. गेल्या महिन्यात ती मुंबईला आली होती आणि निर्मात रितेश सिधवानी, फरहान अख्तरने तिला फिल्म 'रईस'साठी साइन केले आहे.

 

'रईस'चे दिग्दर्शन राहुल ढोलकिया करत आहेत. या चित्रपटात शाहरूख एका डॉनच्या भूमिकेत आहे. तर नवाजुद्दीन सिद्दीकी पोलिसाच्या भूमिकेत आहे. माहिराने आपल्या कॉलेजचा मित्र अली असकरी याच्याशी लग्न केले आहे. सध्या ती कराचीत राहते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.